ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ

Signatures:
  9 (Goal: 100,000)

Petitioning: सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आज आपल्या आया बहिणी शिà¤

Petitioner: SAGAR BHALERAO started on October 30, 2013

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ

ज्या काळात धर्मरुढीचा,धर्मवेड्या लोकांचा समाजावर पगडा होता,त्या काळात समाजाच्या विरुद्ध जाऊन सामाजिक सुदृढतेसाठी फुले दाम्पत्यांने केलेला हा प्रयोग नक्कीच प्रसंशनीय आहे.आज महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं,तर आज आकाशाला गवसणी घालणाऱ्या,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,खेळ अशा सगळ्या क्षेत्रात ज्या महिला दिसत आहेत त्या सावित्रीबाईच्या ऋणी आहेत.काल जर त्यांनी स्रिशिक्षणाची मुहूर्तमेढ रचली नसती तर महिला सक्षमीकारणाचा पायंडा पडलाच नसता.बालविवाहाला विरोध करणाऱ्या सावित्रीबाई,बलात्कारामुळे गरोदर असलेल्या बाईच बाळंतपण करणारी सावित्रीबाई,पोटापाण्यासाठी शरीरविक्री करणाऱ्या माय-माउलीला दृष्टांच्या तावडीतून सोडून आणणारी सावित्रीबाई आणि प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांना आईच्या मायेप्रमाणे सुश्रुषा करणाऱ्या सावित्रीबाई आज देखील एक अद्भुत रसायन वाटतात. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या नामांतरामुळे सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस नक्कीच न्याय मिळणार आहे.त्यांच्या कर्मभूमीत असलेल्या या विद्यापीठाला एक आणखी एक नवी ओळख मिळेल,आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कार्याचा महिमा हा विद्यापीठ रूपाने सर्वांच्या नजरेत राहणार आहेसध्या सिनेटचा हा निर्णय राज्य शासनाकडे विचाराधीन आहे,येणाऱ्या काळात शासन किती लवकर निर्णय घेतो हे पाहण्याजोगे असेल.मराठवाडा नामांतराप्रसंगी झालेला संघर्ष आजूनही पुरोगामी चळवळीतील लोकांच्या मनात भळभळत आहे,१४ वर्षांच्या रक्तरंजित संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला,या वेळी मात्र असा प्रकार घडू नये आणि हि सुयोग्य मागणी मायबाप सरकारने मान्य करावी अशी इच्छा विद्यापीठातील विद्यार्थी,प्राध्यापक आणि सगळेच कर्मचारी व्यक्त करीत आहेत.