डीपॉझीट भरण्याला केंद्र चालकांचा विरोध

Signatures:
  87 (Goal: 500)

Petitioning: Authorized Learning Centers (ALCs) of MS-CIT Course

Petitioner: ATC - प्रशिक्षण संस्थांची संघटना started on December 8, 2014

Online Petition - सरकारकडे याचिका.

डीपॉझीट भरण्याला MS-CIT केंद्र चालकांचा विरोध.

08.12.2014,

प्रती,
श्री. विनोदजी तावडे,
पदसिद्ध अध्यक्ष, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित,
मा. मंत्री - शिक्षण खाते,
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.

महोदय,

MKCL हा सामाजिक बांधिलकी असलेला एक शासकीय उपक्रम आहे आणि MS-CIT हा शासनमान्य संगणक साक्षरता अभ्यासक्रम असून महाराष्ट्रातील हजारो संगणक प्रशिक्षण केंद्रांनी मिळून सुमारे दहा लाख लोकांना संगणक साक्षर करून एक सामाजिक आणि ज्ञानक्रांती केलेली आहे.

MKCL च्या नव्याने आलेल्या परिपत्रकानुसार MS-CIT केंद्रांना मागच्या वर्षी (2014 मध्ये) शहरी भागात 100 आणि ग्रामीण भागात 50 अॅडमिशन झाल्या नसल्यास या वर्षी तेवढ्या अॅडमिशन (सन 2015 साठी) होतील याची हमी म्हणून रुपये 55,800.00 ते 16,740.00 एवढे डीपॉझीट भरावे असे संबंधित TP (Training Provider) ने सर्व कमी अॅडमिशनवाल्या केंद्रांना कळवले आहे. डीपॉझीट न भरणा-या केंद्रांचे नुतनीकरण केले जाणार नाही असेही कळवण्यात आले आहे.

एका शासकीय उपक्रमाने सहभागी केंद्रावर केवळ लहान आहे म्हणून असा अन्याय करणे आणि त्या छोट्या केंद्राला व्यवसायातून उठवण्याचे काहीच कारण नाही. हे सामाजिक बांधिलकीचे लक्षण नाही. सध्या दर वर्षी MS-CIT चा बिझनेस कमी होतोय. त्यामुळे केंद्रांची संख्या कमी करायची आणि आपल्या जरबेतल्या आणि ऐकणा-या केंद्रांनाच नेटवर्कमध्ये ठेवायचे यासाठी अशी डीपॉझीट भरण्याची अन्यायकारक अट घालण्यात आली आहे. सेंटरर्सच्या भांडवली गुंतवणुकीवर, कष्टावर आणि GR च्या पाठबळावर MKCL मोठे झाले आहे. अनेक नवीन केंद्राची अवस्था बिकट आहे. कर्ज काढून केलेली पहिली गुंतवणूक वसूल व्हायच्या आताच डीपॉझीट भरण्याचा आर्थिक बोजा टाकल्यास हजारो नवउद्योजक मोडून पडतील, नाउमेद होतील आणि कर्जाच्या विळख्यात सापडतील.

एखाद्या अर्ध्या एकारातल्या छोट्या शेतक-याचा 10 - 12 टन उस घ्यायला तू छोटा आहेस म्हणून एखाद्या कारखान्याने नकार दिला तर शासन त्यामध्ये नक्कीच हस्तक्षेप करेल. त्याच प्रमाणे छोट्या केंद्रांवर MKCL ने कु-हाड उगारलेली असताना राज्य सरकारने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. केवळ जास्त विद्यार्थी म्हणजे चांगले प्रशिक्षण असे समाजाने चुकीचे आहे. कमी विद्यार्थ्यांना मनापासून आणि समरसून शिकवणारे केंद्रचालकही महत्वाचे आहेत. केवळ संख्या महत्वाची, दर्जाला काहीच किंमत नाही असा स्पष्ट संदेश MKCL देते आहे हे बरोबर नाही.

केंद्रांनी मागील वर्षीचा करार TP बरोबर केला असल्यास त्यामध्ये अशी अट आहे का? मुळात 2014 साठीचा करार (Agreement) झाला आहे का? असल्यास त्यामध्ये Renewal संबंधी काय कलम आहे? त्यानुसार यंदाचे Renewal होणार आहे, का यंदाच नवीन धोरण ठरवून डीपॉझीट मागितले आहे? जर टीपींचा करार MKCL बरोबर असेल तर मान्य केलेले टार्गेट निभावण्याची जबाबदारी कोणाची?

प्रत्येक केंद्राकडून मागील अनेक वर्षे MKCL ने Common Marketing Fund (CMF) म्हणून आठ हजार रुपये घेतले आहेत. त्यामुळे मार्केटिंग ची जबाबदारी MKCL चीच आहे आणि कमी अॅडमिशन झाल्या याला केंद्र चालक जबाबदार नाही.

कोणतेही डीपॉझीट न भरता सर्व केंद्राचे नुतनीकरण झालेच पाहिजे अशी मागणी केंद्र चालकांच्या संघटनेद्वारे करण्यात येत आहे. तसेच सन 2015 च्या MS-CIT Centre Renewal प्रक्रियेतून Training Provider हा घटक काढून टाकावा आणि TP च्या शेअरचे रुपये 150.00 प्रती विद्यार्थी प्रमाणे वाढीव शेअर प्रशिक्षण देणा-या केंद्राला द्यावे अशी आग्रही मागणी प्रशिक्षण केंद्रांच्या संघटनेद्वारे करण्यात येत आहे.

MKCL चे मुख्याधिकारी श्री. विवेक सावंत यांना सदर मागणीचे इमेल, सर्वेक्षणाची आकडेवारी इत्यादी सुमारे 6 महिन्यापासून देण्यात आले आहे आणि पाठपुरावा चालू आहे. मागणीचा विचार करणे दूर, पण त्यांच्याकडून साधी पत्राची पोहोचही देण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर मागणी MKCL च्या संचालक मंडळा समोर मांडण्यात आली. त्यालाही काहीच प्रतिसाद नाही. त्यामुळे आपल्याकडे हा प्रश्न उपस्थित केला आहे.

नवीन सरकाराने आणि आपण वैयक्तिकरित्या लक्ष देऊन सदर प्रश्नी राज्यातील प्रशिक्षण MS-CIT केंद्र चालकांना न्याय मिळवून द्यावा हि नम्र विनंती.

धन्यवाद,

संदीप ताम्हनकर,
प्रशिक्षण संस्थांची संघटना.
9422001165.
Face book पेज - https://www.facebook.com/ATCPune,
Website: - www.atcglobal.org